सोनोग्राफी हे पुरुष व स्त्री या दोघांसाठी वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यास अत्यंत उपयुक्त असं उपकरण आहे. पण, स्त्री व सोनोग्राफी हे समीकरण जरा जास्त रुढ आहे. सोनोग्राफी हे पुरुष व स्त्री या दोघांसाठी वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यास अत्यंत उपयुक्त असं उपकरण आहे. पण, स्त्री व सोनोग्राफी हे समीकरण जरा जास्त रुढ आहे. कारण आजारांशिवाय स्त्रीच्या जीवनात तिला येणाऱ्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये, होणाऱ्या त्रासांमध्ये सोनोग्राफी एखाद्या जीवलग मैत्रिणीसारखी तिला मदत करते.
ही एक निदानाची सुरक्षित पद्धत आहे. कारण यात एक्सरेजच्या ऐवजी खूप जास्त तीव्रतेच्या ध्वनी लहरींचा वापर केल्या जातो. या ध्वनीलहरी वेगवेगळ्या टिश्यूजकडून परावर्तीत होऊन मागे त्यांच्या मुख्य उगमाकडे जातात आणि पोलराईजड कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतात. यात ज्या ध्वनी लहरी वापरल्या जातात, त्या मनुष्याच्या ऐकण्याच्या रेंजपेक्षा अधिक असतात.